हवेलीत नायगाव येथे भिल्ल व पारधी समाजाला जातीच्या दाखल्यांचे वाटप! हवेलीचे महसूल उपविभागीय अधिकारी डॉ. यशवंत माने यांच्याकडून शासकीय योजनांचा लाभ देण्याचा प्रयत्न….

उरुळीकांचन : मुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार शासनाच्या १०० दिवसांच्या महत्त्वकांक्षी कृती कार्यक्रमाअंतर्गत हवेली तालुक्यातील वंचित व दुर्गम घटकांत जीवन जगणाऱ्या नागरीकांना जातीच्या दाखल्यांचे वाटप महसूल प्रशासनाच्या वतीने हवेलीचे उपविभागीय महसूल अधिकारी डॉ. यशवंत माने यांच्या हस्ते नायगाव (ता.हवेली ) येथे करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार राज्यात शासनाचा १०० दिवसांचा महत्वकांक्षी कृती कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यानुसार नागरीकांना शासकीय सेवा मिळून देण्याचा प्रयत्नातून वंचित व दुर्गम घटक असलेल्या नागरीकांना शासकीय सेवा मिळून देण्यात येत आहे.
त्याचाच एक भाग म्हणून नायगाव (ता.हवेली ) येथील भिल्ल व पारधी समाजाच्या नागरीकांना जातीचे दाखले, नवीन शिधापत्रक,जात प्रमाणपत्र अर्ज, उत्पन्न दाखले, संजय गांधी निराधार योजना अर्ज , शिधापत्रक नाव दुरुस्ती आदी प्रकरणांतून शासकीय सेवेचा लाभ मिळून देण्याचा दृष्टीने मेळावा घेण्यात आला.

या मेळाव्यात भिल्ल व पारधी समाजाला जातीचे दाखले हवेलीचे उपविभागीय महसूल अधिकारी डॉ. यशवंत माने यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमास अप्पर तहसीलदार तृप्ती कोलते- पाटील यांच्या उपस्थितीत वितरीत करण्यात आले आहे.
दरम्यान या मेळाव्यात दाखल झालेल्या जातीच्या दाखल्यांसह अन्य शासकीय सुविधांत कागदपत्रांची पूर्तता केलेल्या नागरीकांना अष्टापूर महसूल मंडल अधिकारी गिताश्री काळे यांच्या उपस्थितीत प्रजासत्ताक दिनी जातीच्या दाखल्यांचे वाटप करण्यात आले आहेत.