एसटी पाठोपाठ आता PMPML चे दरही वाढणार, पुणेकरांचे गणित बिघडणार…


पुणे : एसटीपाठोपाठ आता पुण्यातील पीएमपीएलची तिकीट दरवाढ होणार आहे. यामुळे पुणेकरांचे याकडे लक्ष लागले आहे. इंधनाचे वाढते दर, वाहनांच्या सुट्या भागाच्या वाढत्या किंमती आणि कर्मचाऱ्यांची झालेली पगारवाढ यामुळे पुणे महानगर परिवहन महामंडळाची संचलन तूट तब्बल ४९६.४४ कोटींनी वाढली आहे.

यामुळे आता दरवाढ होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत होणाऱ्या डीपीडीसी बैठकीत पीएमपीच्या दरवाढीबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेला पीएमपीच्या खर्च वाढत चालल्याने भाडेवाढ अटळ मानली जात आहे.

शहरात १,७०० बसच्या माध्यमातून पीएमपीकडून सेवा दिली जाते. यातून दररोज १० ते १२ लाख प्रवासी प्रवास करतात. दरम्यान, एसटीच्या तिकीट दरामध्ये १४.९५ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. २५ जानेवारीपासू ही भाडेवाढ करण्यात आली. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लागली.

पीएमपीला २०२३-२४ मध्ये ६६९ कोटींचे उत्पन्न मिळाले. २०२२-२३ च्या तुलनेत उत्पन्नात ६० कोटींनी वाढ झाली आहे. ही वाढ गेल्या काही वर्षात वाढतच चालली आहे. याच वर्षात पीएमपीचा एकूण खर्च १ हजार ४६७ कोटी रुपये झाला आहे. यामुळे भाडेवाढ करण्याशिवाय पर्याय नाही.

दरम्यान, २०२२-२३ च्या तुलनेत खर्चात मात्र १५३ कोटींनी वाढ झाली आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार आता काय निर्णय घेणार याकडे सर्व पुणेकरांचे लक्ष लागले आहे. लवकरच डीपीडीसीची बैठकी होणार असून यामध्ये दरवाढीबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!