आता पुण्यात गुन्हेगारांचा होणार करेक्ट कार्यक्रम!! पुणे पोलीस आयुक्तांनी घेतला मोठा निर्णय, पुणेकरांना दिलासा…

पुणे : शहरात सध्या मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी वाढली आहे. आता वाढती गुन्हेगारी पाहता पोलीस आयुक्तांनी गुन्हेगारांचा करेक्ट कार्यक्रम करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. याबाबत आता पुणे पोलिसांकडून आता ‘कॉप 24’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम पुणे पोलिसांनी सुरु केला आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या उपक्रमांतर्गत 726 पोलिस कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. सध्या या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. लवकरच त्यांच्या सेवेची सुरुवात होईल, ज्यामुळे पुणेकरांना 24 तास गस्त घालणाऱ्या पोलिसांची मदत मिळणार आहे. यामुळे गुन्हेगारीला आळा बसेल असे म्हटले जात आहे.
याबाबत पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी ‘कॉप 24’ उपक्रम सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे रात्रीच्या वेळी देखील होणाऱ्या गुन्हेगारीला आळा बसेल. 726 पोलिस कर्मचारी केवळ गस्त घालण्याचे काम करतील, संपूर्ण शहरात याबाबत पोलीस तैनात असतील.

हे पोलीस गुन्हे शाखेच्या नियंत्रणाखाली कार्य करतील. यामुळे पुणे शहरातील पोलिसांची कार्यक्षमता वाढेल, आणि पुणेकरांना एक सुरक्षित शहर मिळेल. ‘कॉप 24′ उपक्रमामुळे पुणे शहरात पोलिसांचा अहोरात्र पहारा मिळेल. कॉप 24’ अंतर्गत पोलिस कर्मचारी स्थानिक पोलिस ठाण्याच्या दैनंदिन कामांपासून मुक्त असतील.
तसेच गुन्हेगारीवर चाप बसविण्यात मदत होईल. पुणेकरांना भविष्यात आणखी सुरक्षित वाटेल, अशी अपेक्षा असल्याची भावना अमितेशकुमार यांनी यावेळी व्यक्त केली. यामुळे येणाऱ्या काळात गुन्हेगारी थांबणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, पुणे पोलिसांकडून ‘बीट मार्शल’ ही संकल्पना गेल्या अनेक वर्षांपासून राबविण्यात येत आहे. अशातच आता ‘कॉप 24’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम पुणे पोलिसांनी सुरु केला आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.