मुंबईत बिझनेसमनसोबत घडलं भयंकर कांड! ८० लाख दे, पत्नीला माझ्याकडे पाठव, मित्रानेच केली गद्दारी..


मुंबई : एका व्यावसायिकाला त्याच्या मित्राने ब्लॅकमेल करत तब्बल ८० लाखांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हे प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाही, तर आरोपीनं अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत व्यावसायिकाच्या पत्नीकडेही शरीरसुखाची मागणी केली आहे.

ही धक्कादायक घटना मुंबईतील पवई परिसरात उघडकीस आली आहे. आरोपी मागील सहा महिन्यांपासून व्यावसायिकासह त्याच्या पत्नीला त्रास देत होता. अखेर आरोपीच्या सततच्या त्रासाला कंटाळून पीडित व्यावसायिकानं पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी जीवे मारण्याची धमकी, खंडणी आणि ब्लॅकमेलिंगच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. जॉन परेरा असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचं नाव आहे. आरोपी परेरा हा मागच्या सहा महिन्यांपासून पवईतील व्यावसायिक आणि त्यांच्या पत्नीला ब्लॅकमेल करत होती.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी परेरा हा पीडित व्यावसायिकाचा मित्र आहे. त्याच्याकडे व्यावसायिकाचे काही अश्लील व्हिडीओ होते. ज्यात व्यावसायिकाची पत्नी आणि त्यांच्या मैत्रिणीचे देखील काही आक्षेपार्ह फोटोज आरोपीकडे होते. हेच फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी आरोपीकडून दिली जात होती.

आरोपीनं संबंधित फोटो व्हायरल करण्याची धमकी देत व्यावसायिकाकडे तब्बल ८० लाखांची मागणी केली होती. पैसे दिले नाहीत तर सर्व खासगी फोटो तक्रारदार व्यावसायिकाच्या नातेवाईकांच्या आणि ऑफिसच्या ग्रुपवर व्हायरल करू, अशी धमकी आरोपी देत होता. ऑगस्ट २०२४ ते जानेवारी २०२५ पर्यंत आरोपीकडून सातत्याने ब्लॅकमेल केलं जात होतं. आरोपी व्हॉट्सॲपवरून कॉल करून ब्लॅकमेल आणि धमकी देत होता.

दरम्यान, आरोपीच्या सततच्या त्रासाला कंटाळून पीडित व्यावसायिकाने पवई पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी जीवे मारण्याची धमकी, ब्लॅकमेलिंग, आणि खंडणीच्या विविध कलमांतर्ग गुन्हा दाखल केला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!