ऊसतोडणीवेळी शॉर्टसर्किट, मशीनसह 30 एकरातील ऊस जळून खाक, शेतकऱ्यांचे मोठं नुकसान…


एका शेतकऱ्याच्या उसाची यांत्रिकी मशीनद्वारे ऊसतोड सुरू असताना एक धक्कादायक घटना घडली आहे. याठिकाणी बशॉर्टसर्किटमुळे अचानक लागलेल्या आगीच्या घटनेमध्ये यांत्रिकी मशीनसह परिसरातील ३० एकर क्षेत्रातील ऊस जळून खाक झाल्याची घटना कवठेपिरान ता. मिरज याठिकाणी घडली आहे.

यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. समडोळी-कवठेपिरान शिव रस्त्यावर ही घटना घडली आहे. येथील शेतकरी तालीवर नामदेव कांबळे यांच्या अडीच एकर उसाची पोरले (ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) येथील यांत्रिक मशीनचे मालक अभिजीत शिवाजी काशीद यांच्या यांत्रिकी मशीनद्वारे ऊसतोड सुरू होती.

अचानक यांत्रिकी मशीनमध्ये बिघाड झाल्याने शॉर्टसर्किटच्या घटनेने आग निर्माण झाली. ही आग क्षणात इतकी वाढली की संपूर्ण मशीन जळून खाक झाली. यामध्ये जवळचा जवळपास ३० एकर क्षेत्रातील उसाने पेट घेतला. जवळपास सगळा ऊस असल्याने ही आग वाढतच गेली. यामुळे मोठं नुकसान झाले.

दरम्यान, उन्हाचा तडाखा, अग्नीचे रौद्ररूप लक्षात घेऊन एका शेतकऱ्याने दूरध्वनीवरून संपर्क साधला असता अग्निशमन पथकाने घटनेची गांभीर्य लक्षात घेऊन आग आटोक्यात आणण्यात यश मिळविले. मात्र तोपर्यंत मोठे नुकसान झाले. याबाबत पंचनामा करण्याचे काम सुरू आहे.

दरम्यान, या दुर्घटनेमध्ये २५ ते ३० एकर ऊस आणि यांत्रिकी मशीन जळाल्याने कोट्यवधीचे नुकसान झाले. अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळण्याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये सुरू होती. मात्र इतर अनेक शेतकऱ्यांचेही यामध्ये नुकसान झाले आहे. यामुळे भरपाईची मागणी केली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!