पुणे, कोल्हापूर, सोलापूरनंतर आता गुलेन बॅरी सिंड्रोमचे नागपूरमध्ये आढळले रुग्ण, महाराष्ट्र विळख्यात जात असल्याने टेंशन वाढलं…


पुणे : पुण्यात मोठ्या प्रमाणावर आढळून येत असलेल्या गुलेन बॅरी सिंड्रोम रुग्णांची संख्या शंभरच्या पार गेली आहे. आठवड्याभरातच पुण्यातील गुलेन बॅरी सिंड्रोमची रुग्णसंख्या आतापर्यंत १२० हून अधिक संशयित रुग्ण आढळून आले आहेत. हा एक दुर्मीळ आजार असून हा आजार संसर्गजन्य नाही.

आता राज्याच्या अनेक शहरांमध्ये देखील गुलेन बॅरी सिंड्रोमचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. आता कोल्हापूर, सोलापूर नंतर आता नागपुरात देखील रूग्ण आढळले आहेत. यामुळे याठिकाणी मोठी खळबळ उडाली. नागपुरात 3 रुग्णांना गुलेन बॅरी सिंड्रोमची लागण झाली आहे.

त्यांच्यावर नागपुरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जीबीएसच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने राज्यातील आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. यामुळे योग्य काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नागपूरमध्ये एक रुग्ण हा गंभीर अवस्थेत आयसीयुत असल्याची माहिती समोर आली आहे.

तसेच दुसऱ्या रुग्णाची या आजारातून बऱ्यापैकी रिकव्हरी झाली आहे. तिसरा रुग्ण सध्या जनरल वॉर्डमध्ये उपचार घेत आहे. यामध्ये हातापायांना मुंग्या येणे, अशक्तपणा, बोलण्यास व गिळण्यास त्रास होणे ही असून या आजाराचे पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर रुग्ण सापडल्याने याचा अभ्यास सुरू आहे.

यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे हेच गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. पुण्यामध्ये थैमान घातलेल्या जीबीएस या आजाराचे दोन रुग्ण कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयामध्ये दाखल आहेत. कोगनोळी कर्नाटक येथील ६० वर्षांचे वृद्ध आणि हुपरी (ता. हातकणंगले) येथील ६ वर्षांच्या मुलावर दोन दिवसांपासून सीपीआर रुग्णालयात उपचार सुरु आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!