पुण्यात धुमाकूळ घालणारा गुलेन बॅरी सिंड्रोम नेमका आहे तरी काय? नेमकं काय आहेत लक्षणे, उपाय, वाचा महत्वाची माहिती…

पुणे : पुण्यात सध्या एकच चर्चा सुरू आहे. आता गुलेन बॅरी सिंड्रोम रुग्णांची संख्या शंभरच्या पार गेली आहे. आठवड्याभरातच पुण्यातील गुलेन बॅरी सिंड्रोमची रुग्णसंख्या १०१ वर पोहचली आहे. यामधील काही रुग्णांची प्रकृती चिंताजनक ही आहे.
तसेच सध्या १६ गुलेन बॅरी सिंड्रोम रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून ते व्हेंटिलेटरवर आहेत. महत्त्वाचे म्हणजे पुण्यात एकाच दिवसांत २८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. रुग्ण आढळून आलेल्या परिसरात आरोग्य विभागाकडून २५ हजार ५७८ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. राज्यातील एकूण रुग्णांपैकी ६८ पुरुष आणि ३३ महिला आहेत.
गुलेन बॅरी सिंड्रोममुळे ४० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. गुलेन बॅरी सिंड्रोममुळे झालेला हा राज्यातला पहिला मृत्यू आहे. पुण्यातील धायरी परिसरात वास्तव्याला असणाऱ्या ४० वर्षीय व्यक्तीला गुलेन बॅरी सिंड्रोमची लागण झाली होती. त्यानंतर तो उपचारासाठी सोलापुरातील एका खासगी रुग्णालयात दाखल झाला होता. मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.
यामुळे हा व्हायरस नेमका आहे तरी काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. गुलेन बॅरी सिंड्रोममुळं नसांवर परिणाम होतो. स्नायू कमकुवत होवून संवेदना कमी होतात. हाता पाय किंवा चेहऱ्याच्या स्नायूंना पॅरालिसिस होण. हा दरवर्षी 1 लाख लोकांमधून 1 व्यक्तीला हा आजार होतो.
यावर उपाय म्हणजे, हात पाय वारंवार धुवा, योग्य आहार घ्या, संक्रमित रुग्णांपासून दूर राहा, शरिरात मुंग्या येत असेल किंवा कमकुवतपणा जाणवत असेल तर डॉक्टरांशी तातडने संपर्क साधा. 16 गुलेन बॅरी सिंड्रोम रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून ते व्हेंटिलेटरवर आहेत.