लाडक्या बहिणींनो बँक खाते चेक करा, जानेवारी महिन्यातले १५०० रुपये झालेत जमा, जाणून घ्या…

पुणे : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जानेवारीच्या सातव्या हप्त्याची रक्कम लाभार्थी महिलांच्या खात्यात येण्यास सुरुवात झाली आहे. याबाबत मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यात 26 जानेवारीपूर्वी रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पहिल्या दिवशी 1 कोटी 10 लाख महिलांच्या खात्यात रक्कम जमा झाल्याची माहिती तटकरे यांनी दिली. असे असले तरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची रक्कम वाढवू असं आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी दिला होतं. मात्र तस काही झालं नाही.
महायुतीच्या नेत्यांनी त्यांचं सरकार आल्यास महिलांच्या खात्यात दरमहा 2100 रुपये देऊ असे आश्वासन दिले होते. मात्र सध्या तरी 1500 रुपयेच मिळणार आहेत.आता लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार असा प्रश्न विरोधकांकडून करण्यात येत आहे.

वाढता लोड बघता जास्तीचे पैसे मिळण्याची शक्यता कमीच आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पानंतर त्याबाबत निर्णय होईल, असं सांगितलं होतं. त्यानुसार अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर महिलांना 2100 रुपये मिळणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, आज पहिल्या दिवशी 1 कोटी 10 लाख लाभार्थी महिलांच्या खात्यात सन्मान निधी जमा झाला असल्याची माहिती आदिती तटकरेंनी दिली. 26 जानेवारी पर्यंत सर्व पात्र महिलांच्या खात्यात सन्मान निधी जमा होणार आहे. यामध्ये त्रुटी असलेल्या महिलांना पैसे मिळणार का? हे लवकरच समजेल.