हॉलीबॉल खेळताना मैदानावरच क्रीडामंत्री कोसळले, भरणे मामांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, नेमकं काय घडलं?


पुणे : राज्याचे क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांनी नुकताच पदभार स्वीकारला. दत्तात्रय भरणे यांनी नुकतंच पुणे जिल्ह्यातील एका क्रीडाप्रसंगी व्हॉलीबॉल खेळण्याचा आनंद लुटला. मात्र यावेळी खेळताना त्यांचा तोल गेला आणि ते मैदानावर पडले, याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मावळमध्ये महाविद्यालयातील क्रीडा संकुलाचे उद्घाटन पार पडले. या क्रीडा संकुलाचे उद्धाटन क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी अनेक खेळाडू आणि क्रीडा शिक्षकांसोबत खेळण्याचा आनंद घेतला. मात्र खेळताना त्यांचा तोल गेला. याचा विडिओ व्हायरल झाला.

यावेळी दत्तात्रय भरणे यांना दुखापत झाली आहे. मात्र सुदैवाने यात ते थोडक्यात बचावले. यावेळी त्यांनी भाषणात देखील हा किस्सा सांगितला आहे. ते म्हणाले, लोखंडी पोलवर धडकण्याच्या आधी त्यांनी स्वत:ला सावरलं. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. मात्र त्यांना मुक्का मार लागल्याची कबुली त्यांनी जाहीरपणे दिली.

तसेच ते म्हणाले, राजकारणात पण पडलो, पुन्हा 2019 ला राज्यमंत्री झालो आणि आत्ता कॅबिनेट मंत्री झालो, जो पडतो तोच सावरतो असे वक्तव्य दत्ता भरणे यांनी केले. व्हिडीओत क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे हे व्हॉलिबॉल खेळण्याचा आनंद घेताना दिसत आहेत. सुरुवातीला दत्तात्रय भरणेंनी व्हॉलिबॉल योग्यरित्या टोलावला.

नंतर तोल गेला आणि ते जमिनीवर कोसळले. यात त्यांना मुक्का मार लागला. याबाबत मंत्र्‍यांनाही खेळ खेळण्याचा मोह आवरला नाही अन् त्या मोहापायी ते चक्क व्हॉलिबॉल खेळण्यासाठी चक्क मैदानात उतरले. याचे अनेक व्हिडीओही व्हायरल झाले. यामुळे याची चांगलीच चर्चा सुरू झाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!