मुंबई हादरली! रिक्षाचालकाचा २० वर्षीय तरूणीवर बलात्कार, प्रायव्हेट पार्टमध्ये ब्लेड, दगड अन्…; घटनेने उडाली खळबळ


मुंबई : राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच मुंबईतून एक संतापजनक घटना समोर आली आहे.

गोरेगाव पूर्व पोलिस ठाण्याच्या हद्दीतील राम मंदिर स्टेशनजवळ एका २० वर्षीय तरुणीवर बलात्कार करून तिच्यावरती निर्दयीपणे हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. तरुणीवर बलात्कार करून तिच्यावर सिझेरियन ब्लेड आणि दगडांसह हल्ला करून तिला जखमी अवस्थेत सोडून हल्लेखोराने पळ काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, एका अज्ञात रिक्षाचालकाने पीडितेवर हल्ला केल्याची माहिती मिळाली आहे. मुंबई पोलिसांकडून हल्लेखोराचा शोध घेण्यात आला आहे. पीडित तरूणी मुंबईतील राम मंदिर स्टेशनच्या आवारात बेशुद्ध अवस्थेत आढळली आहे.

दरम्यान, या पिडित तरूणीच्या गुप्तांगात काही दगडाचे तुकडेही घालण्यात आले होते. गोरेगाव पूर्वेत वनराई पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. याप्रकरणी वनराई पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी रिक्षा चालकाला अटक केली आहे. पुढील तपास वनराई पोलीस करत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!