सैन्याचं चीता हेलिकॉप्टर कोसळलं! 2 वैमानिकांचा मृत्यू….!

नवी दिल्ली : भारतीय सैन्य दलासाठी एक वाईट बातमी आहे. लष्कराच चीता हेलिकॉप्टर कोसळलं .अरुणाचल प्रदेशमध्ये ही मोठी दुर्घटना घडली आहे.
बोमडिला येथे गुरुवारी लष्कराचे चित्ता हेलिकॉप्टर कोसळले. पश्चिम कामेंग जिल्ह्याचे एसपी बी. आर. बोमरेड्डी यांनी सांगितले की, हेलिकॉप्टर अपघातात दोन्ही वैमानिकांचा मृत्यू झाला आहे.
लेफ्टनंट कर्नल व्हीव्हीबी रेड्डी आणि मेजर जयंत एका असे मारले गेलेल्यांचे नाव आहे. वैमानिकांचे मृतदेह अपघातस्थळावरून बाहेर काढण्यात आले आहेत. दोघांचे मृतदेह जवळच्या रुग्णालयात आणण्यात येत असून, तेथेच अंतिम कारवाई केली जाईल. दुपारी चारच्या सुमारास मृतदेह आढळून आला. लष्कराने चौकशीचे आदेश दिले आहेत.
Views:
[jp_post_view]