तो १७ वर्षांचा, ती १६ वर्षांची, इन्स्टावरून ओळख अन् लैंगिक संबंध, त्यानंतर घडला धक्कादायक प्रकार..


गुजरात : गुजरातमधील सुरत येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी एका १७ वर्षीय मुलाला ताब्यात घेतले आहे. या मुलाने इन्स्टाग्रामवर १६ वर्षीय मुलीशी मैत्री करून तिच्याशी संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर संबंधित मुलगी गर्भवती राहिली.

यानंतर तिचा गर्भपात करून अर्भक नाल्यात फेकून देण्यात आले. पक्षी घिरट्या घालू लागल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. मुलगी गर्भवती राहिल्यानंतर मुलाने तिला गर्भपातासाठी मुंबईहून गोळ्या मागवून दिल्या. त्यानंतर मुलीचा घरीच गर्भपात झाला. मुलीने तो गर्भ नाल्याजवळ फेकून दिला.

त्या गर्भाजवळ पक्षी घिरट्या घालत होते. ही घटना सुरतमधील अपेक्षा नगर परिसरात घडली. ९ जानेवारी रोजी या परिसरात काही मुले खेळत होती. त्यांची नजर नाल्याजवळ घिरट्या घालणाऱ्या पक्ष्यांवर पडली. मुलांनी दगडफेक केली. जवळ जाऊन पाहिले असता त्यांना एक गर्भ पडलेला दिसला आहे.

दरम्यान, त्यांनी आरडाओरडा केला आणि पोलिसांना पाचारण करण्यात आले. हा गर्भ एका मुलीचा होता. तिला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले आहे.

झोन ४ चे डीसीपी विजय सिंह गुर्जर यांनी सांगितले की, गर्भ सापडल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. परिसरातील एका अल्पवयीन मुलीवर पोलिसांना संशय आला. मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी नवीन सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी ती गर्भवती असल्याची पुष्टी केली. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, तपासाअंती असे आढळून आले की मुलगी १६ वर्षांची होती आणि ती ३ जानेवारीपर्यंत शाळेतगेली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीची इन्स्टाग्रामवर एका १७ वर्षीय मुलाशी मैत्री झाली होती. मुलगा सुरतच्या पांडेसरा येथे भाड्याच्या घरात राहत होता. त्यांच्यात शारीरिक संबंध प्रस्थापित झाले आणि त्यामुळे मुलगी गर्भवती राहिली. पोलिसांनी सांगितले की, मुलीच्या गरोदरपणाची माहिती मिळताच मुलगा उत्तर प्रदेश आणि नंतर मुंबईला पळून गेला.

पोलीस अधिकाऱ्याने मुलीच्या हवाल्याने सांगितले की, मुंबईतील मुलाने तिला गर्भधारणा संपवण्यासाठी गोळ्यांचे पॅकेट पाठवले. तिने दोन गोळ्या घेतल्या आणि घरीच गर्भपात केला. तिने गर्भ फेकून दिला मुलाला ताब्यात घेण्यात आले असून त्याला बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात येणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!