मित्र झाले सैतान! नोकरीसाठी मुंबईत नेलं, मुलावर केला लैगिंक अत्याचार, घटनेने खळबळ..


मुंबई : गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार वेगात वाढले आहे.

अशातच आता उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलासोबत लैगिंक अत्याचाराचा प्रकार उघडकी आला आहे. तीन मुलांनी अल्पवयीन मुलाला नोकरी देण्याच्या बहाण्याने मुंबईत नेलं. नंतर नशेचे औषध देत त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला.

तीन आरोपींमध्ये एक आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती समोर आली आहे. या खळबळजनक घटनेनंतर देवरिया जिल्हा हादरला आहे. यासंदर्भात पोलीस अधिक्षक विक्रांत वीर यांनी सांगितले की, पीडित मुलाचे वय १५ वर्ष आहे.

त्याच्यावर लैगिंक अत्याचार करणारे आरोपींचे वय १५ ते १८ आहे. ही धक्कादायक घटना रूद्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ३ जानेवारीला घडली आहे. पीडितेवर स्थानिक रूग्णालयात उपचार सुरू असून, अल्पवयीन मुलाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

पीडित मुलाच्या कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार, एका आरोपीने मुलाला नोकरी देण्याच्या बहाण्याने मुंबईला नेले होते. तेथे आरोपीने त्याला नशेचं औषध दिलं, त्यामुळे तो बेशुद्ध होऊन पडला. बेशुद्ध पडल्यानंतर आरोपींनी त्याच्यावर लैगिंक अत्याचार केला.

शुद्धीवर आल्यानंतर त्याने थेट आपले गाव गाठले. आरोपी देखील गावात आले. गावात आल्यानंतरही आरोपींनी पुन्हा अल्पवयीन मुलावर लैगिंक अत्याचार केला. याप्रकरणानंतर पीडित मुलाची प्रकृती गंभीर असून, रूग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!