मोठी बातमी! सैफ अली खान हल्ला प्रकरणी एक जण ताब्यात, धक्कादायक माहिती आली समोर…


मुंबई : अभिनेता सैफ अली खानच्या वांद्रे येथील घरात चोर शिकला. या चोराने त्याच्यावर जीवघेणा हल्ला. सैफवर चाकूने सपासप वार केले. सैफ यात गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरू होते. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांची चौकशी केली होती. या प्रकरणी आता मोठी अपडेट समोर येत आहे.

या प्रकरणात एका संशयीत व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ताब्यात घेतलेला व्यक्ती तोच आहे का याचा शोध पोलिसांकडून घेतला जाईल. जवळपास अनेक सीसीटीव्ही पाहिल्यानंतर पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे. पोलिसांकडून लवकरच याबाबत सविस्तर माहिती दिली जाईल.

संशयित म्हणून ताब्यात घेतलेला व्यक्तीच आरोपी आहे का हे तपासानंतर स्पष्ट होईल, अशी माहिती आहे. मुंबई पोलिसांनी सैफ अली खान हल्ला प्रकरणात तपासासाठी २० पथकं तयार केली होती.

दरम्यान, अभिनेता सैफ अली खान याच्यावर १६ जानेवारीला मध्यरात्री सव्वा दोन ते अडीच्या दरम्यान एका व्यक्तीनं हल्ला केला होता. त्यामध्ये सैफ अली खान जखमी झाला होता. मुंबई पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं आहे.

मुंबई पोलिसांनी संशयित व्यक्तीच्या शोधासाठी अनेक पथकं तयार केली होती. मुंबई पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेत वांद्रे पोलीस स्टेशनला नेलं आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारा व्यक्ती हाच आहे का याचा तपास मुंबई पोलिसांकडून केला जाणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!