वाल्मिक कराडच्या मोबाईलमध्ये अमेरिकेचे सिमकार्ड! ३ वेगवेगळे फोन, आता तपासात भयंकर माहिती आली समोर…


बीड : बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याला अखेर ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

वाल्मिक कराडला काल बीड कोर्टात जर करण्यात आले आहे. यावेळी एसआयटी आणि सरकारी वकिलांनी महत्त्वाचा युक्तिवाद केला. तसेच तपास अधिकाऱ्यांनीदेखील कोर्टात मोठे गौप्यस्फोट केले आहे.

अशात आता वाल्मीक कराडचं अमेरिका कनेक्शन देखील समोर आलं आहे. काही दिवसांपूर्वी पोलिसांनी वाल्मीक कराडचे तीन मोबाईल जप्त केले होते. यातून आता खळबळजनक खुलासा समोर आला आहे. दरम्यान पोलिसांनी तपासासाठी वाल्मीक कराडचे दोन फोन जप्त केले होते. या फोनमधून खळबळजनक खुलासा झाला आहे.

पोलिसांनी वाल्मीक कराडचे जे तीन मोबाईल जप्त केले होते. त्यातील काही सीमकार्ड अमेरिकेत रजिस्टर करण्यात आल्याचं समोर आलं आहे. विधानसभा निवडणुकीच्या विशिष्ट काळात याच मोबाइलवरून काही लोकांना फोन केल्याचा संशय एसआयटीला आहे.

आता वाल्मीकने हे फोन कुणाला केले? कशासाठी केले? याची माहिती अद्याप समोर आली नाही. मात्र त्याचे सीमकार्ड अमेरिकेत रजिस्टर असल्याने या प्रकरणात नवा ट्वीस्ट आल्याचं बघायला मिळत आहे. सध्या एसआयटीकडून वाल्मीकच्या अमेरिका कनेक्शनचा तपास केला जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!