अमृता फडणवीसांना 1 कोटी लाचेची ऑफर; मुंबईतील डिझायनरवर गुन्हा दाखल…!

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी एका डिझायनरविरुद्ध केलेल्या तक्रारीने खळबळ उडाली आहे. मुंबईतील एका डिझायनर 1 कोटी रुपयांची लाचेची ऑफर दिली, तसेच धमकी आणि कट रचला होता, असा आरोप अमृता फडणवीस यांनी केला आहे. याप्रकरणी अमृता फडणवीस यांनी दिलेल्या तक्रारीवरून मुंबईतील मलबार हिल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

राज्याचे उपमुख्यममंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याविरुद्ध कट रचल्याचा प्रकार समोर आला आहे. मुंबईतील डिझायरने अमृता फडणवीस यांना विशिष्ट स्वरूपाची माहिती पुरवण्यासाठी आणि वडिलांविरुद्ध असलेला गुन्हा कुमकुमत करण्यासाठी 1 कोटी रुपये देण्याची ऑफर दिली होती.

Views:
[jp_post_view]