मोठी बातमी! सरपंच संतोष देशमुख हत्याकांडात आरोपी विष्णू चाटेची अखेर कबुली, वाल्मिक कराड घटनास्थळी उपस्थित होता..

बीड : बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेनंतर राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. या घटेनचा सर्व स्तरावरुन निषेध केला जात आहे.

तसेच ३१ डिसेंबरला वाल्मिक कराड पोलिसांना शरण आला. पण मुख्य आरोपी सुदर्शन घुलेसह तीन जण फरार होते. त्यातल्या दोन आरोपींना पकडण्यात आले आहे. अशातच आता वाल्मिक कराड आणखी गोत्यात येण्याची शक्यता आहे.
विष्णू चाटेच्या चौकशीत विष्णू चाटेने एक महत्त्वाची कबूली दिली आहे आणि त्यामुळेच वाल्मीक कराड हा संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आरोपी होऊ शकतो असे समोर आले आहे.

वाल्मीक कराड याने पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांशी फोनवर बोलणं संभाषण केले होते अशी माहिती विष्णू चाटे याने दिली आहे. सीआयडीने न्यायालयात दिलेल्या अहवालात ही कबुली नमूद करण्यात आली आहे. त्यामुळे विष्णू चाटे याच्या फोनवरून वाल्मीक कराड याने धमकी दिल्याची जी तक्रार कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केली होती, ती चाटे याने कबूल केली आहे. त्यामुळे आता वाल्मीक कराड अडचणीत येऊ शकतो.

दरम्यान, आता या कबलीमुळे वाल्मीक कराडचा खंडणी प्रकरणांमध्ये थेट संबंध असल्याचे समोर आले आहे वाल्मीक कराड यानेच खंडणी मागितली, मात्र ती विष्णू चाटे याच्या फोनवरून मागितली होती. त्या ठिकाणी वाल्मीक कराड स्वतः उपस्थित होता हे आता उघड झाले आहे. त्यामुळे कराड याच्यावरती खंडणीचा असलेला आरोप चाटे याने मान्य केला आहे.
कोण आहे विष्णू चाटे?
संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट विष्णू चाटे यांनी रचला होता विष्णू चाटे हा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तालुकाध्यक्ष असून तो कवडगाव या गावचा सरपंच देखील होता.