शिक्षक पती- पत्नीने कालव्यात उडी मारून केला आयुष्याचा शेवट, जुन्नर येथील घटना, धरणाजवळ गेले काहीतरी बोलले अन्…

जुन्नर : तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. येथील वारूळवाडी गावात डिंभे डाव्या कालव्यात प्रा. चिराग चंद्रशेखर शेळके व त्यांच्या पत्नी प्रा. पल्लवी चिराग शेळके या दोघांनी उडी मारून आत्महत्या केली. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस तपास सुरू आहे.

या घटनेने सगळेच हादरले असून पल्लवी शेळके या पुण्यातील एका महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणून काम करत होत्या. तसेच चिराग शेळके हे नारायणगाव येथील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षक म्हणून काम करत होते. वर्षापूर्वीच दोघांचे लग्न झाले होते. मात्र त्यांनी असा निर्णय का घेतला या प्रश्नाचे उत्तर अनेकांना मिळाले नाही.
दोघेही जुन्नर तालुक्यातील वारूळवाडी गावातील अभंग वस्ती येथे राहत होते. घरात फक्त चिराग त्यांची पत्नी पल्लवी व त्यांची आई अशी तिघेजणच राहत होते. हे दोघेजण दुचाकीवरून डिंभे कालव्यावर आले होते. त्यांच्यात काहीतरी वाद सुरू होता, असेही काहींनी सांगितलं.

नंतर काही वेळातच दोघांनीही कालव्यात उडी मारली. ते बघून जवळचे लोक धावत गेले. मात्र डिंबे कालव्याचा प्रवाह वेगात असल्याने ते दिसले नाहीत. याबाबतची माहिती गावात देण्यात आली. त्यानंतर पोलीस देखील तातडीने त्याठिकाणी पोचले. मात्र त्यांचा तपास लागला नाही.
दोघांचा शोध घेण्यात स्थानिक यंत्रणा सक्रिय झाली. कुकडी पाटबंधारे विभागाने डिंबे डाव्या कालव्यातील पाणी कमी केले. नंतर सकाळी नऊ वाजता पल्लवीचा मृतदेह आढळला. त्यानंतर चिराग यांचाही मृतदेह सापडला. घटनेने सगळेच हादरले असून याबाबत कारण समोर आले नाही. फक्त त्यांच्यात काहीतरी वाद असल्याचे दिसून आलं आहे.