मोठ्या आकाला वाचवण्यासाठी वाल्मिक कराडचे एन्काऊंटर होण्याची शक्यता, मोठ्या नेत्याच्या दाव्याने खळबळ…


बीड :  बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी सीआयडी तपासाला प्रचंड वेग आला आहे. या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड हे स्वत:हून पुण्याच्या सीआयडी कार्यालयात सरेंडर झाले.

तसेच त्यांना अटक झाल्यानंतर बीड पोलीस ठाण्यात पाच पलंग आणण्यात आले. त्यावरुन विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांनी या प्रकरणी सरकारवर टीका केली आहे.

विजय वड्डेटीवार यांनी वाल्मिक कराडचे एन्काऊंटर होऊ शकते, अशी माहिती एका बड्या अधिकाऱ्याने आपणास दिल्याचे माध्यमांशी बोलताना सांगितले. माध्यमांशी बोलताना विजय वड्डेटीवार यांनी म्हटले की, पोलीस ठाण्यात वाल्मिक कराड याचे लाड पुरवले जात आहे. त्याच्यासाठी पोलीस ठाण्यात बेड आले.

त्यावर पोलिसांसाठी बेड आणल्याचा खुलासा केला. पण यापूर्वी कधी पोलीस ठाण्यात बेड आणले गेले नाही. पोलीस आतापर्यंत कधी कॉटवर झोपले नाही. मग हे कोणाचे लाड करत आहे. पोलीस कोठडीत वाल्मिक कराड याला झोपवण्यासाठी ते कॉट आणले गेले काय, याची चौकशी झाली पाहिजे, असे वड्डेटीवार यांनी म्हटले आहे.

विजय वड्डेटीवार यांनी पोलीस दलातील बड्या अधिकाऱ्याचा हवाला देऊन मोठा दावा केला आहे. ते म्हणाले, मोठ्या आकाला वाचवण्यासाठी लहान आकाचा एन्काऊटर होऊ शकतो.

त्यामुळे माझी पोलिसांना विनंती आहे की त्याचा एन्काऊंटर करु नका. त्यामुळे पुरावे नष्ट होण्याची शक्यता आहे. आपण कराडचे एन्काऊटर करण्याची माहिती उच्चपदस्त अधिकाऱ्याने दिल्याचा दावा त्यांनी केला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!