…म्हणून आम्ही पवारांना घाबरुनच असतो ! शिंदे गटाच्या मंत्र्याचे मोठे वक्तव्य…!

जळगाव : शिंदे गटाचे आमदार मंत्री गुलाबराव पाटील हे सतत चर्चेत असतात. आता त्यांचा एक विडिओ व्हायरल झाला आहे. एका विवाह सोहळ्यात गुलाबराव पाटील यांनी केलेल्या फटकेबाजीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

विवाह सोहळ्यातील मुलीकडच्या मंडळीचे आडनाव पवार होते. यावरुन गुलाबराव पाटील म्हणाले, आम्ही पवारांना घाबरुनच असतो. कारण तुम्ही सकाळी-सकाळी शपथ घेता आणि काय करुन टाकता ते आम्हाला माहिती नाही.
त्यामुळे पवारांना कायम बरोबर ठेवावे लागते. कारण पवारांची बुद्धी चालते तशी कोणचीही चालत नाही. जळगाव जिल्हातील त्यांच्या जळगाव ग्रामीण मतदार संघात गुलाबराव पाटील मंगळवारी लग्नात वधू वरांना आशीर्वाद देण्यासाठी गेले होते.


वधू ही पवार नाव असलेल्या कुटुंबातील असल्याने गुलाबराव पाटील यांनी आपल्या भाषणावेळी फटेकबाजी करुन कार्यक्रमाला एकच रंगत आणली. मंत्री गुलाबराव पाटील हे आपल्या विशिष्ट भाषा शैलीमुळे नेहमीच चर्चेत असतात.
