डिसेंबरच्या हप्त्यानंतर जानेवारीच्या हप्त्याचीही तारीख ठरली, लाडक्या बहिणींना या दिवशी नवीन वर्षाची भेट मिळणार…


मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सगळीकडे चर्चा आहे. ही योजना जुलै २०२४ पासून चालू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जाते.

आत्तापर्यंत जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या सहा महिन्यांचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आलें आहेत. म्हणजेच, एका पात्र महिलेला आतापर्यंत नऊ हजार रुपयाचा लाभ या ठिकाणी मिळालेला आहे.

दरम्यान आता या योजनेच्या संदर्भात एक नवीन लेटेस्ट माहिती समोर आली आहे. ती म्हणजे या योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता अर्थातच सातवा हप्ता जानेवारी महिन्यात महिलांच्या खात्यात जमा होणार आहे.

आनंदाची बातमी अशी की या योजनेचा हप्ता हा मकर संक्रांतीच्या आधीच पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्याची योजना फडणवीस सरकारने आखलेली आहे. जानेवारी महिन्याचा हप्ता दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात जमा होऊ शकतात. त्यामुळे महिलांना लवकरच पैसे मिळणार आहेत.

दरम्यान, संक्रातीआधी महिलांना सातवा हप्ता दिला जाऊ शकतो. त्यामुळे महिलांची यंदाची संक्रात गोड होणार आहे. दरम्यान,याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. यामुळे संक्रांतीच्या आधी या योजनेचा पैसा महिलांच्या खात्यात जमा होणार का हे पाहणे विशेष उत्सुकतेचे ठरणार आहे.

२१०० रुपये कधी मिळणार?

महायुतीने या योजनेअंतर्गत भविष्यात २१०० रुपये देऊ अशी ग्वाही दिलेली आहे. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर म्हणजेच नवीन वर्षात जो अर्थसंकल्प सादर होईल त्या अर्थसंकल्पानंतर या योजनेची रक्कम २१०० रुपये होऊ शकते. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच याबाबतचे संकेत दिले आहेत. अर्थातच एप्रिल २०२५ पासून या योजनेची रक्कम २१०० रुपये होण्याची दाट शक्यता आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!