वाल्मिक कराड महाराष्ट्रातच!! संतोष देशमुख हत्या प्रकरणी CID लवकरच मुसक्या आवळणार….


बीड : गेल्या काही दिवसांपासून मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग आला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. हा तपास आता सीआयडीकडे वर्ग करण्यात आला असून सीआयडीने अनेकांची चौकशी सुरु केली आहे. यामध्ये अनेकांची नावे समोर येत आहेत.

तसेच संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टरमाईंड वाल्मिक कराड असल्याचे बोलले जात आहे. वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचा आहे, असा आरोप संतोष देशमुख यांचे कुटुंबीय आणि गावकऱ्यांकडून केला जात आहे.

त्यात आता वाल्मिक कराडबद्दल एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा मास्टरमाईंड असलेला वाल्मिक कराड हा महाराष्ट्रातच असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, वाल्मिक कराड हा महाराष्ट्राच असून सीआयडीचे विशेष पथक त्याच्या शोधासाठी रवाना झाले आहे. आजपासून सीआयडीच्या आणखी ४ टीम वाल्मिक कराडचा शोध घेणार आहेत. त्यामुळे वाल्मिक कराडच्या मुसक्या लवकरच आवळल्या जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!