पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त!! नवीन वर्षात सर्वसामान्यांना मिळणार आनंदाची बातमी, जाणून घ्या….

महागाईने त्रस्त असलेल्या सर्वसामान्य लोकांना नवीन येणारे वर्ष दिलासा देणारं असण्याची शक्यता आहे. फेब्रुवारी महिन्यात देशाचा अर्थसंकल्प सादर करण्यात येणार असून त्याची तयारी सुरू झाली आहे. यामध्ये अनेक घोषणा होण्याची शक्यता आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

उद्योग संस्था आणि उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ अर्थमंत्र्यांना विविध सूचना देत आहेत. यामध्ये आयकर सवलत, इंधनावरील कर कमी करण्याच्या सूचनांसह अनेक मागण्यांचा समावेश आहे. याबाबत सरकार विचार करत असल्याचे दिसून येत आहे.
भारतीय उद्योग परिसंघाने २०२५-२६ या आर्थिक वर्षाच्या सर्वसाधारण अर्थसंकल्पासाठी आपल्या सूचनांमध्ये इंधनावरील उत्पादन शुल्क कमी करण्याची सूचना केली आहे. जर असं केलं तर याचा फायदा सर्वसामान्य लोकांना होणार आहे. इंधनाच्या किमतींमुळे महागाईत लक्षणीय वाढ होत असल्याचे दिसून आले आहे.

कमी उत्पन्न स्तरावर, वापर वाढवण्यासाठी ही सूट देण्यात यावी, असे उद्योग संस्थेने म्हटले आहे. तसेच वार्षिक २० लाख रुपयांपर्यंतच्या वैयक्तिक उत्पन्नासाठी आयकर सवलत देण्याचा विचार बजेटमध्ये करण्यात आला आहे. यामुळे याबाबत देखील निर्णय होण्याची शक्यता आहे.

आयकर कमी केल्याने लोकांच्या हातात पैसा वाचेल, ज्यामुळे बाजारात मागणी वाढण्यास मदत होईल, असे उद्योग संस्थेचे म्हणणे आहे. त्यामुळे सरकारच्या महसुलातही वाढ होईल. यामुळे हा सरकारचाच फायदा आहे. यामुळे येणाऱ्या काळात अर्थमंत्री याबाबत विचार करत आहेत.
पेट्रोलच्या किरकोळ किमतीच्या २१ टक्के आणि डिझेलसाठी १८ टक्के असल्याचे उद्योग संस्थेने म्हटले आहे. गेल्या दोन वर्षात जागतिक कच्च्या तेलाच्या किमतीत अंदाजे ४० टक्के घट झाल्याच्या अनुषंगाने हे दर समायोजित केले गेले नाहीत. इंधनावरील उत्पादन शुल्क कमी केल्याने महागाई कमी होईल.
तसेच सरकारला पीएम-किसान योजनेअंतर्गत वार्षिक पेमेंट ६,००० रुपयांवरून ८,००० रुपयांपर्यंत वाढवण्याची सूचना करण्यात आली आहे. यामुळे हा एक दिलासादायक निर्णय शेतकऱ्यांच्या बाबतीत होण्याची शक्यता आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.