गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईची पुन्हा सलमान खानला धमकी…!

नवी दिल्ली : पंजाबमधील गायक सिद्धू मूसेवाला याची हत्या झाल्यानंतर सलमानला धमकीचे पत्र मिळाले होते. सलमानला धमकी आल्यामुळे संपूर्ण बॉलिवूडमध्ये खळबळ माजली होती. त्यांनतर आता गस्टर लॉरेन्स बिश्नोईने तुरुंगातून एका टीव्ही वाहिनीला मुलाखत दिली. यात त्याने मोठे खुलासे केले असतानाच त्याने सलमानला पुन्हा धमकी दिली आहे. सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी लॉरेन्सने सलमानचा अभिमान भंगणार असल्याचे म्हटले आहे. त्याने आपल्या समाजाला निराश केले आहे. आपल्या समाजात झाडे, वनस्पती आणि प्राणी यांच्याबद्दल खूप श्रद्धा आहे. सलमानने आमच्या समाजाचा अपमान केला आहे. त्याने सर्वांसमोर येऊन माफी मागावी अशी आमची इच्छा आहे. राजस्थानमधील बिकानेरमध्ये आमच्या समाजाचे एक मंदिर आहे. सलमानने तिथे जाऊन माफी मागावी. त्यांनी असे केले तर आमचा त्यांच्याशी काही संबंध नाही. त्याने तसे केले नाही तर आम्ही कायद्याचा आधार घेणार नाही. स्वतःच्या पद्धतीने हिशोब करु.
दरम्यान,यापूर्वी 2022 मध्ये सलमान खानला एका पत्राद्वारे धमकी देण्यात आली होती. हे पत्र सलमान खानचे वडील सलीम खान यांना मिळाले आहे. त्यात लिहिले होते की, सलमान खानची अवस्था सिद्धू मूसवालासारखी होईल. 2018 मध्ये पहिल्यांदा लॉरेन्स बिश्नोईने सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. तेव्हापासून सलमान खान या टोळीच्या निशाण्यावर आहे. वास्तविक, सलमान खान 1998 च्या काळवीट शिकार प्रकरणात अडकला आहे. आता लॉरेन्स बिश्नोईला अभिनेत्याकडून या शिकारीचा बदला घ्यायचा आहे. खुद्द लॉरेन्स बिश्नोई याने 2018 मध्ये सलमानच्या हत्येचा कट रचल्याचा खुलासा केला आहे.
लॉरेन्स भटिंडा मध्यवर्ती कारागृहात बंद आहे. 29 मे 2022 रोजी पंजाबमधील मानसा जिल्ह्यातील जवाहरके गावाजवळ प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. कॅनडात बसलेल्या गोल्डी बार्डने या हत्येची जबाबदारी घेतली. लॉरेन्स याच्या सांगण्यावरून त्याने खून केला.