वहिनीसोबत अनैतिक संबंधाचा संशय, तरुणाने थेट डोक्यात घातला दांडा, भयंकर माहिती आली समोर…

नागपूर : नागपूरमध्ये वहिनीशी अनैतिक प्रेमसंबंधाच्या संशयातून एक हत्या झाली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून याबाबत पोलीस तपास करत आहेत. ही घटना कळमना पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडली आहे. आरोपीबाबत देखील भयंकर माहिती समोर आली आहे.

तसेच पोलिसांच्या तपासामध्ये मृत व्यक्ती राहुल गुप्ता हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे, असेही समोर आलं आहे. याबाबत पोलिसांनी तपास सुरु करुन आरोपीला अटक केली आहे. वहिनीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरुन राहुल गुप्ताचा मृत्यू झाला. सुरुवातीला याबाबत माहिती समोर येत नव्हती.
या गुन्ह्यात आरोपी राजन खानला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. काही दिवसांपूर्वी राजन आणि राहुल यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली होती. अशी देखील माहिती समोर आली आहे. त्यावेळी दोघांनीही एकमेकांना जीवे मारणार असल्याची धमकी दिली होती. आता मात्र ही घटना घडली आहे.

दरम्यान, संध्याकाळी सातच्या सुमारास एका दुकानाजवळ उभा होता. त्याठिकाणी राहुलदेखील पोहोचला. त्यांच्यामध्ये वाद सुरु झाला. त्या दोघांनीही एकमेकांना शिवीगाळ करायला सुरुवात झाली. वाद वाढत गेला आणि ते हाणामारी करु लागले. यातूनच ही घटना घडली आहे.
हाणामारीत राजाने रस्त्याच्या बाजूला पडलेला लाकडी दांडा उचलला आणि जोरात राहुलच्या डोक्यात मारला. नंतर राहुलला सोडून राजा पळून गेला. राहुलने झालेला प्रकार मित्राला सांगितला. नंतर कुटूंबाला याबाबत माहिती समजली. त्याला रुग्णालयात दाखल करण्यासाठी सांगितले गेले.
त्याच्या डोक्याला मार लागला होता. रुग्णालयात जाण्यास राहुल गुप्ताने नकार दिला. ते सर्वजण घरी परतले. घरी गेल्यावर राहुल झोपी गेला. दुसऱ्या दिवशी मात्र त्याचा रात्रीच मृत्यू झाला होता. पोलिसांनी राहुल गुप्ताच्या मृत्यूनंतर कळमना पोलिसांनी राजा खानला अटक केली.