मनमोहन सिंह यांचा ‘तो’ निर्णय आणि आपल्या देशाचे नशिबच पालटले, कोणता होता निर्णय? वाचा…

नवी दिल्ली : भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं वयाच्या ९२ व्या वर्षी काल रात्री निधन झालं असून संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. भारतीय अर्थव्यवस्थेच्या वळणाचे जनक म्हणून डॉ. मनमोहन सिंग यांना ओळखले जाते. देशाच्या मजबूतीत त्यांचे मोठं योगदान आहे.

देशासाठी त्यांनी मोठं काम केलं, कामाप्रती असलेला शैक्षणिक दृष्टिकोन, जनसामान्यांसाठी असलेली उपलब्धता आणि विनम्र आचरणामुळे ते कायमच चर्चेत असायचे. डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर देशात ७ दिवसांचा शासकीय दुःखवटा जाहीर करण्यात आला आहे. या काळात सर्व सरकारी कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
दरम्यान, १९९१ ला आपल्या अर्थव्यवस्थेवर मोठं संकट आले होते. हा तो काळ ह देश गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत होता. तेव्हाचे अर्थमंत्री डॉ. मनमोहन सिंह यांनी धाडसी निर्णय घेऊन भारताला वाचवण्यासाठी आरबीआयकडे (रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया) ४४ टन सोने गहाण ठेवून निर्णय घेतले होते.

याचा मोठा फायदा देशाला झाला आणि देशात विकास झाला. भारताने आंतरराष्ट्रीय बाजारात ६७ टन सोने गहाण ठेवले, जे स्वित्झर्लंड आणि बँक ऑफ इंग्लंडला पाठवण्यात आले. यामुळे भारताला ६०० दशलक्ष डॉलर्सचे कर्ज मिळाले जो विदेशी कर्ज फेडण्यासाठी आणि आयात टिकवण्यासाठी वापरले गेले.
या निर्णयामुळे राजकारणी यांच्याकडून टीकेला सामोरे जावे लागले. तरी एक कठीण पाऊल उचलले गेले ज्यामुळे भारताची अर्थव्यवस्था सुधारण्यास मदत झाली. यानंतर याचे फायदे वेळोवेळी दिसून आले. नंतर जागतिक गुंतवणूक आणि स्पर्धेसाठी भारतीय बाजारपेठा खुल्या झाल्या, परवाना राज रद्द करण्यात आला. विदेशी कंपन्यांना भारतीय बाजारपेठेत प्रवेश परवानगी देण्यात आली.
यामुळे आपल्या अर्थव्यवस्थेत वेगवान वाढ दिसून आली आणि भारताला एक उदयोन्मुख जागतिक शक्ती म्हणून पाहिले जाऊ लागले. दरम्यान, डॉ. मनमोहन सिंग हे मितभाषी होते, पण काही ठिकाणी त्यांनी केलेली शेरोशायरीतून उत्तरं आणि वक्तव्यं कायम चर्चेत राहिली आहेत. त्यांचा शांत आणि समंजस दृष्टिकोन भारतीय राजकारणात आदर्श ठरला. यामुळे आज हळहळ व्यक्त केली जात आहे.