ब्रेकिंग! अहमदनगरमध्ये H3N2 चा पहिला रुग्ण दगावला….!


अहमदनगर : देशासह महाराष्ट्रात H3N2 चे संकट (H3N2 Virus) वाढले आहे. राज्यात दोन संशयित रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. H3N2मुळे देशात आतापर्यंत पाच जणांचे मृत्यू झालेत तर महाराष्ट्राच्याही मोठ्या शहरांमध्ये H3N2 चा फैलाव वाढायला लागला आहे.

महाराष्ट्रात मध्ये सध्या 170 पेक्षा जास्त रुग्ण H3N2 इन्फ्लुएन्झा व्हायरसने बाधित आहेत. यामध्येच आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

देशातील तिसरा आणि महाराष्ट्रातील पहिल्या H3N2 इन्फ्लुएन्झा व्हायरस बाधित रुंगांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. एमबीबीएसच शिक्षण घेणार्‍या 23 वर्षीय तरुणाचा नगरमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे देशासह महाराष्ट्राचं देखील टेन्शन वाढलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत्यू झालेला तरुण हा औरंगाबाद जिल्ह्यातील रहिवासी असून तो नगरमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत होता. महाराष्ट्रामधील H3N2 इन्फ्लुएन्झा व्हायरसचा हाच तरुण पहिला मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे आता महाराष्ट्राचं टेन्शन वाढलं आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!