अभिनेता सयाजी शिंदे यांच्यावर वृक्षांचे पुनर्रोपन करताना मधमाशांचा हल्ला…!


पुणे : अभिनेता सयाजी शिंदे यांच्यावर मधमाशांनी हल्ला केला आहे. शिंदे हे पर्यावरण आणि वृक्षारोपन, झाडांचे संवर्धन यांबाब नेहमीच आग्रही राहिले आहेत. सयाजी शिंदे यांनी वृक्षारोपणासाठी राज्यभर विविध उपक्रम राबवले आहेत.

दरम्यान, पुणे- बंगळूर महामार्गाचे रुंदीकरण कामादरम्यान वृक्षांचे पुनर्रोपन करत असताना शिंदे यांच्यावर मधमाशांनी हल्ला केला. महामार्गावरील तासवडे गावानजिक ही घटना घडली. मधमाशांचा हल्ला होतो आहे हे लक्षात येताच शिंदे यांना तातडीने त्यांच्या वाहनात बसविण्यात आले. वाहनात बसल्यामुळे सयाजी शिंदे यांच्यावर अधिक धोकादायक परिस्थिती ओढावली नाही. त्यामुळे ते सुखरुप आहेत, असे सांगण्यात  येत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!