Police Transfer : १५५ पोलीस निरीक्षक पुन्हा मुंबईत, विधानसभा निवडणुकीपूर्वी झाली होती बदली..

Police Transfer : राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मुंबई बाहेर बदली केलेल्या अधिकाऱ्यांपैकी १५५ पोलीस निरीक्षक मुंबईत परतले आहेत. राज्य पोलीस दलातील अस्थापनाचे अप्पर पोलीस महासंचालक डॉ. सुखविंदर सिंह यांनी बुधवारी याबाबतचे आदेश दिले.

राज्य पोलीस दलातील अस्थापनाचे अप्पर पोलीस महासंचालक डॉ. सुखविंदर सिंह यांनी बुधवारी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. ज्या अधिकार्यांची मुंबईत बदली करण्यात आली आहे, त्यात पुण्याचे शशिकांत जगदाळे, महेश पंढरीनाथ गुरव यांचा समावेश आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ३० ऑक्टोबरला राज्यातील एकूण ३३३ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यात मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेल्या सर्वाधिक १६१ अधिकाऱ्यांच्या मुंबई बाहेर बदल्या करण्यात आल्या होत्या. Police Transfer

मुंबईतून गोंदिया, नागपूर, कोल्हापूर, जालना, पालघर इत्यादी जिल्ह्यामध्ये बदली करण्यात आलेल्या होत्या, त्यामुळे हे सर्व अधिकारी नाराज झाले होते. यातील काही अधिकाऱ्यांनी मॅट आणि काहींनी उच्च न्यायालयात सुद्धा धाव घेतली होती.
दरम्यान, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आलेल्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला या पुन्हा परतल्यानंतर मुंबईबाहेर बदली झालेले अधिकारी पुन्हा मुंबईत परतण्याची आशा ठेवून बसले होते. अखेर, राज्य पोलीस मुख्यालयाने बुधवारी २१५ पोलीस निरीक्षकांच्या बदलीचे आदेश जारी केले आहेत. मुंबईबाहेर बदली झालेले १५५ अधिकारी परत आले आहेत.
तर, राज्य पोलीस दलातील पोलीस प्रशिक्षण केंद्र, गुन्हे अन्वेषण विभाग, नागरी हक्क संरक्षण अशा विभागांमधून मुंबईत नियुक्ती करण्यात आलेल्या ११२ पोलीस निरीक्षकांपेकडे ६० अधिकाऱ्यांच्या त्यांच्या स्वेच्छेने पुन्हा जुन्या नियुक्तीच्या ठिकाणी परत बदली करण्यात आली आहे.