500 कोटींचा गैरव्यवहार, आता दौंडमधील विरोधकही राहुल कुल यांच्या विरोधात एकवटले…!


पाटस : येथील भिमा पाटस कारखान्यामध्ये ५०० कोटींचे मनी लॅंडरींग झाल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लेटर लिहीले असून आता याची चौकशी करा, अशी मागणी केली आहे.

हा कारखाना भाजप आमदार राहुल कुल यांच्या संबंधीत आहे. ते या कारखान्याचे अध्यक्ष आहेत. यामुळे आता चौकशी होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. असे असताना आता दौंडचे माजी आमदार रमेश थोरात यांनी देखील याबाबत मोठे वक्तव्य केले आहे.

थोरात म्हणाले, कुल अध्यक्ष असलेल्या भीमा पाटस कारखान्याकडे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे १७९ कोटी रुपये थकलेले आहेत. बॅंकेचे पैसे भरल्याशिवाय कारखाना चालू करणार नाही, असा शब्द त्यांनी दिला होता.

असे असताना कुलांनी कुठलाच शब्द पाळला नाही, त्यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी माजी आमदार रमेश थोरात यांनी केली. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, राहुल कुल यांनी भीमा पाटस कारखान्यात ५०० कोटींचा गैरव्यवहार केला आहे.

त्यांची ईडी, सीबीआयकडून चौकशी झाली पाहिजे, अशा मागणीचे पत्र राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविले आहे. दरम्यान, संजय राऊत यांनी ट्विटरवर ट्विट करत आज राज्यभरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली.

हे सर्व प्रकरण ईडी व सीबीआयच्या ताब्यात देऊन भिमा सहकारी साखर कारखान्यातील घोटाळेबाजांवर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील भिमा सहकारी साखर कारखान्याने गेल्या काही वर्षात केलेल्या गैरव्यवहाराचे प्रकरण हे सरळसरळ ५०० कोटींचे मनी लॅंडरींग असल्याचा आरोप केला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!