Maharashtra Assembly Elections : मतदानाच्या आठ दिवस आधी सर्व्हेतून मोठी माहिती समोर! राज्यात महायुती की महाविकास आघाडी? जाणून घ्या…


Maharashtra Assembly Elections : निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. राजकीय पक्ष अनेक बैठका, पत्रकार परिषद, सभा घेत आहेत. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या.

२० नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून २३ नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. यामुळे सगळीकडे प्रचारसभा आणि प्रचाराचे जल्लोष सुरू आहेत. दोन्ही प्रमुख आघाड्यांकडून दिल्लीतील बडे नेते प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत.

याचदरम्यान, एक प्रसिद्ध मॅटराईज ओपीनियन पोल समोर आला असून, यामध्ये राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी दोन्ही आघाड्यांच्या ताकदीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

या सर्व्हेनुसार, महायुतीला १४५ ते १६५ जागा जिंकण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे, तर महाविकास आघाडीला १०६ ते १२६ जागांपर्यंत सीमित राहण्याची शक्यता आहे. राज्यात एकूण २८८ विधानसभा जागा आहेत आणि यंदा महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात थेट लढत होणार आहे.

महायुतीत शिवसेना एकनाथ शिंदे, भाजप आणि अजित पवार यांचा गट आहेत, तर महाविकास आघाडीत शिवसेना उद्धव ठाकरे गट, शरद पवार गट आणि काँग्रेस यांचा समावेश आहे. Maharashtra Assembly Elections

मिळालेल्या माहिती नुसार, सर्वेक्षणानुसार, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, मुंबई, ठाणे-कोकण आणि उत्तर महाराष्ट्र या सर्व प्रमुख क्षेत्रांमध्ये महायुतीला जास्त जागा मिळण्याची शक्यता आहे. विशेषत: पश्चिम महाराष्ट्रात महायुतीला ३१ ते ३८ जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर महाविकास आघाडीला २९ ते ३२ जागांपर्यंत सीमित राहण्याची शक्यता आहे. विदर्भात महायुतीला २७ ते ३२ जागा मिळू शकतात, तर महाविकास आघाडीला २१ ते २६ जागा मिळण्याची संभावना आहे.

दरम्यान, तसेच, मुंबईत महायुतीला २१ ते २६ जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर महाविकास आघाडीला १० ते १३ जागा मिळण्याची शक्यता आहे. ठाणे-कोकण मध्ये महायुतीला २३ ते २५ जागा आणि महाविकास आघाडीला १० ते ११ जागा मिळू शकतात.

उत्तर महाराष्ट्रात महायुतीला १४ ते १६ जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर महाविकास आघाडीला १६ ते १९ जागा मिळू शकतात. हा सर्व्हे यापेक्षा जास्त खरा ठरेल की नाही, हे २३ नोव्हेंबरला निवडणूक निकाल जाहीर झाल्यावरच स्पष्ट होईल.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!