Crime News : हडपसर येथील धक्कादायक घटना!! कॅब चालकाच्या पत्नीची हत्या करून मृतदेह लपवला सोफ्यात….


Crime News : दिवसागणिक पुण्यातली गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या पुण्यात वेगात वाढले आहेत.

सध्या अशीच एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हडपसर येथे कॅबड्रायव्हर गावी गेला असतांना त्याच्या पत्नीची कुणीतरी हत्या करून मृतदेह हा घरातील सोफ्यात लपवून ठेवला. हडपसर भागातील फुरसुंगी परिसरात ही घटना घडली.

महिलेच्या खुनामागचे कारण समजू शकले नसून, पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. पती घरी आल्यावर त्याला घरात पत्नी दिसली नाही. यामुळे त्याने तिचा शोध घेतला. मात्र, ती सापडली नाही. दरम्यान, दोन दिवसानंतर तिचा मृतदेह घरातील सोफ्यात आढळला.

स्वप्नाली उमेश पवार (वय २४, रा. अष्टविनायक कॉलनीजवळ, हुंडेकरी वस्ती, फुरसुंगी ) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.

नेमकं घडलं काय?

स्वप्नाली यांचा खून करुन मृतदेह सोफ्याच्या कप्यात ठेवला होता. या बाबतची माहिती पोलिसांना शुक्रवारी मिळाली. या प्रकरणी स्वप्नाली यांचे पती उमेश यांनी तक्रार दिली. स्वप्नाली हिचा पती उमेश हा कॅब चालक आहे. तो शुक्रवारी सकाळी पाचच्या सुमारास बीडला प्रवासी घेऊन गेला होता.

या दरम्यान, त्याने पत्नी स्वप्नालीची चौकशी करण्यासाठी तिला फोन केला. तिला वारंवार फोन करून देखील तिने फोन उचलला नाही. त्यामुळे उमेशला काळजी पडली. त्यामुळे त्याने त्याच्या मित्राला फोण करून घरी जाऊन येण्यास सांगितले. मात्र, त्याने घर बंद असल्याचे सांगितले.

दरम्यान, शुक्रवारी रात्री ८ च्या सुमारास तो घरी परत आला. यावेली त्याला घराला बाहेरून कडी लावल्याचे दिसले. दरम्यान, घराची कडी उघडल्यानंतर त्याला पत्नी घरात दिसली नाही. त्याने तिचा शोध घेतला. मात्र, ती सापडली नाही. पत्नीचा पत्नीचा दोन दिवस शोध घेत उमेश सोफा-कम-बेडवर झोपला होता.

शनिवारी पहाटे पत्नीच्या काही मौल्यवान वस्तूही गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्याने सोफ्याचा स्टोअरेज डबा उघडला असता त्यात पत्नीचा मृतदेह दिसला.शोध घेत मित्राच्या दुचाकीवरून उमेशने हडपसर परिसरात पत्नीचा शोध घेतला. तो त्यांच्या मित्र-मैत्रिणींच्या आणि कुटुंबियांच्या घरीही गेला, पण स्वप्नाली कुठेच सापडली नाही.

फुरसुंगी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मंगल मोढवे यांनी सांगितले की, दुर्दैवाने तो ज्या सोफ्यावर झोपला होता,त्याच सोफ्यात पत्नीचा मृतदेह सापडल्याने तो हादरलेल्या अवस्थेत आहे.” स्वप्नालीची गळा दाबून हत्या करण्यात आली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे, असे मोढवे यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याच्या हवाल्याने सांगितले. उमेशला पत्नीचा मृतदेह सापडल्यानंतर त्याने याची माहिती हडपसर पोलिसांना दिली.

पुणे पोलिसांचे पथक त्याच्या घरी पोहोचले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. तसेच मृतदेह हा शवविच्छेदसाठी पाठवण्यात आला. प्राथमिक अहवालात स्वप्नाली खून हा गळा दाबून असल्याचे स्पष्ट झाले आगे. या अहवालात तिच्या गळ्यावर नखांच्या खुणा ही आढळल्या आहेत.

स्वप्नाली घरात असतांना तिच्या घरात कुणी बळजबरीने घुसल्याचा कोणताही पुरावा दिसला नाही. त्यामुळे आरोपी हा तिच्या ओळखीचा असावा, असे पोलिसांनी सांगितले. स्वप्नालीचा मृतदेह सापडल्यापासून संशयती व्यक्तीचा फोन बंद आहे, अशी माहिती परिमंडळ पाचचे पोलिस उपायुक्त आर. राजा यांनी दिली.

दरम्यान, पती उमेशबाबत बोलायचे झाले तर गुन्ह्याच्या वेळी तो पुण्यात नव्हता, हे सिद्ध झाले आहे. हडपसर विभागाच्या सहाय्यक पोलिस आयुक्त अश्विनी राख यांनी घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर सांगितले की, महिलेच्या गळ्यावरील नखांच्या खुणा आणि जखमांवरुन आरोपीने तिचा गळा दाबून खून केल्याची शक्यता आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!