संतांची भूमी अजूनच सुशोभित होणार, पालखी मार्गाची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली पाहणी…!


पुणे : आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यातील पालखी महामार्गाची पाहणी केली. महाराष्ट्रातील देहू व पंढरपूर या दोन महत्त्वाच्या धार्मिक स्थळांना जोडणाऱ्या या महामार्गाचे घोषणा त्यांनी काही वर्षांपूर्वी केली होती.

यावेळी माढ्याचे खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर देखील उपस्थित होते. संत तुकाराम महाराज पालखी मार्ग हा १३० किमी लांबीचा महामार्ग पुणे जिल्ह्यातील पाटस – बारामती – इंदापूर – अकलुज – बोंडले पर्यंत विकसित करण्यात येत आहे.

या मार्गावर एकूण ११ पालखी स्थळे असून वारकऱ्यांच्या सोयीसाठी या सर्व ठिकाणी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यामुळे या महामार्गाच्या वैभवात अजूनच मोठी भर पडणार आहे. सध्या या महामार्गाचे काम सुरू असून लवकरच ते पूर्ण होईल.

या पालखी मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण करण्यात येणार आहे. तसेच आवश्यक त्या ठिकाणी महाराष्ट्रातील संत महात्म्यांची शिल्पे, भित्तीचित्रे, अभंगवाणी आदि सुविधांसह सौंदर्यीकरण करण्यात येईल. वारकऱ्यांना वारीच्या दरम्यान या सुविधांचा फायदा होईल.

पालखी मार्गावर विशिष्ट प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. यामध्ये विशेषतः चंदन, तुळशी, इतर सुगंधित वृक्षांबरोबरच वड, कडुनिंब, पिंपळ, चिंच या सावली देणाऱ्या वनौषधी वृक्षांची लागवड करण्यात येत आहे. यामुळे हा रोड कधी खुला होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!