Sadabhau Khot : शरद पवारांबाबतच्या वादग्रस्त विधान भोवलं! सदाभाऊ खोतांच्या विरोधात तक्रार दाखल…
Sadabhau Khot : महायुतीतील नेते सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्या विरोधात वादग्रस्त विधान केलं त्यानंतर राजकारण चांगेलच तापले असून हे वादग्रस्त विधान सदाभाऊ खोत यांना भोवल आहे.
शरद पवारांना त्यांच्या तोंडासारखा महाराष्ट्र करायचा आहे का? असं सदाभाऊ खोत यांनी काल जतच्या सभेत म्हटलं आणि त्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. हे वादग्रस्त विधान सदाभाऊ खोत यांना भोवले आहे.
खोत यांच्याविरोधात भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. माजी आमदार विलास लांडे यांनी तक्रार दाखल केली आहे. शरद पवारांबाबतचं असं विधान खपवून घेणार नाही, असे विलास लांडे म्हणाले आहे. Sadabhau Khot
सदाभाऊ खोत हे भाजपने पाळलेले कुत्रे आहे. त्यांचे वक्तव्य निंदनीय आहे. शरद पवार हे एक मोठे नेते आहेत. त्यांच्याबाबत माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केलेलं वक्तव्य अशोभनीय आहे. खोत यांच्या पाठीमागे बोलावता धनी कोण आहे? भाजप जे पळालेलं एक कुत्र आहे. ते भुंकत असतं. म्हणून ते शरद पवार यांच्यावर बोलत आहेत.
त्यांचं वक्तव्य हे निंदनीय आहे. सदाभाऊ खोत यांना फिरू देणार नाहीत. आमच्या पक्षाला लुटारू म्हणणारे सदाभाऊ हे स्वत: लुटारू आहेत. त्यांनी अस बोलण हास्यास्पद आहे. सदाभाऊ खोत यांच्यावर कारवाई करावी. नेता कुठल्याही पक्षाचा असावा त्यावर बोलताना तारतम्य ठेवून बोलावं, असं विलास लांडे यांनी म्हंटले आहे.