पठ्ठ्याने बैलाच्या वाढदिवसाला गौतमी पाटीलला दिली सुपारी, सातारमध्ये होणार ग्रँड सेलिब्रेशनची…!

सातारा : सध्या सर्वत्र गौतमी पाटीलची जोरदार चर्चा सुरू आहे. असे असताना आता सातारमधून एक बातमी समोर आली आहे. काही दिवसांपूर्वीच एका पाच वर्षाच्या मुलाच्या वाढदिवसाला गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन सातारा जिल्ह्यातील एका गावामध्ये केले होते.
असे असताना आता तर चक्क सातारा जिल्ह्यातील खर्शी, जावली येथील बैलगाडा मालक पैलवान सतीश भोसले यांनी महाराष्ट्र चॅम्पियन अश्विन या बैलाच्या वाढदिवसाला गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यामुळे याची चर्चा सुरू आहे.
आश्विन या बैलाचा तिसरा वाढदिवस आहे. त्यानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यंदा तर त्यांनी चक्क गौतमी पाटील हिच्या लावणी नृत्याच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. सतीश भोसले आणि त्यांच्या कुटुंबीयांचे आश्विन या त्यांच्या शर्यतीच्या बैलावर जीवापाड प्रेम आहे.
दरवर्षी ते या बैलाचा वाढदिवस उत्साहात साजरा करतात. यावर्षी त्यांनी चक्क गौतमी पाटीलला बोलावल्याने याची राज्यात चर्चा सुरू झाली आहे. याची सध्या जोरदार तयारी सुरू आहे.