Big Announcement : केंद्र सरकारचा मोठा निर्णय! पुढील चार वर्षापर्यंत मिळणार मोफत धान्य..

Big Announcement : केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. देशातील गरीब जनतेला यापुढे तब्बल चार वर्षापर्यंत मोफत धान्य मिळत राहणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आज (९ऑक्टोबर) पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोफत धान्य वितरणाची मुदत ४ वर्षांसाठी वाढवण्यास मंजुरी देण्यात आली. या बैठकीत इतर अनेक योजनांना ग्रीन सिग्नल देण्यात आला.

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळातील निर्णयांची माहिती दिली. मंत्रिमंडळाने जुलै २०२४ ते डिसेंबर २०२८ पर्यंत प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना आणि इतर कल्याणकारी योजनांतर्गत मोफत तांदळाचा पुरवठा सुरू ठेवण्यास मंजुरी दिली. सरकारच्या या उपक्रमाचा उद्देश विकासाला चालना देणे आणि पोषण सुरक्षा वाढवणे हा आहे. Big Announcement


दरम्यान, देशातील गरजूंपर्यंत तांदूळ पोहोचवण्यासाठी पुरवठा साखळी विकसित केली जाईल. फोर्टिफाइड तांदळाची गुणवत्ता तपासण्यासाठी ५२ लॅब तयार करण्यात आल्या आहेत. पुरवठा साखळी विकसित करण्यासाठी ११,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे.