Shivsena : मोठी बातमी! शिवसेनेने दसरा मेळाव्याचे स्थळ अचानक बदलले, आता या ठिकाणी होणार मेळावा…

Shivsena : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याची परंपरा सुरु केली होती. त्यानंतर दरवर्षी दसरा मेळावा होत असतो. शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना उबाठाकडून वेगवेगळे दसरा मेळाव्या घेतले जातात.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या परंपरेत साजरा होणारा दसरा मेळावा यंदा एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानावर होणार आहे. दरवर्षीप्रमाणे, याही वर्षी शिवसेनेत फूट पडल्यामुळे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या गटांनी स्वतंत्र मेळावे आयोजित केले आहेत.
यंदा, एकनाथ शिंदे यांचा मेळावा बीकेसीमधील एमएमआरडीए मैदानावर होणार होता, पण ट्रॅफिकच्या समस्यांमुळे स्थान बदलण्यात आले आहे. आझाद मैदानावर सध्या भव्य व्यासपीठ उभारण्याचे काम सुरू आहे आणि मैदान साफ करण्याचे काम देखील जोरात चालू आहे. Shivsena

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, या मेळाव्यात शक्ती प्रदर्शन करण्याची शिवसेनेची तयारी आहे. आझाद मैदानात ५०,००० खुर्च्या बसविण्यात येणार आहेत, जेणेकरून मोठ्या संख्येने लोक उपस्थित राहू शकतील.
दरम्यान, एकनाथ शिंदेंचा हा तिसरा दसरा मेळावा आहे, याआधीच्या दोन्ही मेळाव्यांमध्येही भव्य उपस्थिती दिसून आली होती. यंदाच्या मेळाव्यात शिवसेना मोठे दावे, आश्वासनं आणि अन्य पक्षातील नेत्यांचा पक्ष प्रवेश याबद्दल चर्चा करणार आहे.