पुण्यात देहविक्री करणाऱ्या महिलांसाठी धारा मेळा, पर्णकुटी संस्थेचा पुढाकार…!


पुणे : पुण्यात बुधवार पेठेत मोठ्या प्रमाणावर देहविक्री केली जाते. आता याठिकाणी देहविक्री व्यवसाय करणार्‍या महिला व ट्रान्सजेंडर समुदायासाठी पर्णकुटी संस्थेच्या वतीने ‘धारा मेळा’ हा नावीन्यपूर्ण उपक्रम आणि आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

बुधवार पेठ परिसरामध्ये देहविक्री व्यवसाय करणार्‍या महिला व त्यांची मुले, एचआयव्ही संसर्गित व बाधित तसेच ट्रान्सजेंडर व्यक्तींसाठी संस्थेच्या ‘धारा’ प्रकल्पांतर्गत आयोजित कौशल्य प्रशिक्षण कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

तसेच याठिकाणी फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया संस्थेतर्फे मोफत आरोग्य शिबिर झाले. तसेच जीवनावश्यक पौष्टिक आहार किटचे वाटप करण्यात आले.

महिलादिनाचे औचित्य साधून बुधवार पेठेत आयोजित या कार्यक्रमाला पर्णकुटी संस्थेच्या सहसंस्थापिका स्नेहा भारती, अखिल बुधवार पेठ देवदासी संस्थेचे प्रकाश यादव उपस्थित होत्या.

तसेच फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडियाचे अभिजित लोंढे व सहकारी, स्वस्ती संस्थेचे गिरिजा ठाकूर व शिवाजी मोरे, मंथन संस्थेच्या आशा भट्ट, कस्तुरबा महिला खादी ग्रामोद्योग विद्यालयाच्या मृदुला जक्कल तसेच सामाजिक कार्यकर्त्या प्रियंका रायरकर, दीपक बनकर, उदयकाळ फाउंडेशनचे नीलेश बागुल, प्रेरणा वाघेला,

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!