Sharad Pawar : मराठा आरक्षणाबाबत मोदी सरकारने पुढाकार घ्यावा, आरक्षण विधेयकातील दुरुस्ती करावी आम्ही पाठिंबा देऊ, शरद पवार यांचे मोठं वक्तव्य….
Sharad Pawar : लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. सर्वच राजकीय पक्षांकडून विधानसभा निवडणुकीसाठी जोमाने तयारी केली जात आहे. राज्यात यंदा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्या सामना पाहायला मिळणार आहे.
सत्ताधारी आणि विरोधकांनाही दौरे करतेवेळी आरक्षणाचा प्रश्न सतावत आहे. सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनाही आरक्षणाच्या मुद्यावरून घेरले जात आहे. मनोज जरांगे पाटील मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीवर ठाम आहेत. दुसरीकडे ओबीसी समाजही रस्त्यावर येऊन आंदोलन उपोषण करीत आहेत.
या सर्वांमध्ये सरकारची मोठी अडचण निर्माण झाली आहे. याबाबत आता शरद पवार यांनी मोठे विधान केले आहे. मराठा आरक्षणासाठी केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा. आरक्षण विधेयकामध्ये दुरुस्ती करावी. आपण सरकारच्या बाजूने उभे राहू. ५० % आरक्षणाच्या वर जाता येत नाही, पण त्याच्यावर जायचं असेल तर संसदेत बदल केला पाहिजे. दुरुस्ती करायला काही हरकत नाही, अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली आहे.
शरद पवार काय म्हणाले?
शरद पवार म्हणाले, मराठा आरक्षणासाठी केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा, आरक्षण विधायकमध्ये दुरुस्ती करावी आपण सरकारच्या बाजूने राहू. ५० टक्के आरक्षणावर जाता येत नाही, पण त्याच्यावर जायचं असेल तर संसदेत बदल केला पाहिजे, दुरुस्ती करायला काही हरकत नाही, ५० टक्क्यांच ७५ टक्क्यांवर जायला पाहिजे.
ते पुढे म्हणाले की, तमिळनाडूमध्ये ७८% वर आरक्षण जातं तर महाराष्ट्रात ७५% वर का होऊ शकत नाही. ७५ टक्के झाल्यास सगळ्यांनाच आरक्षण मिळेल ज्यांना मिळालं नाही त्यांनाही मिळेल कोणताही वाद उरणार नाही,” असे शरद पवार यांनी म्हंटले आहे.