Pune : पुणे पोलीस आयुक्तालयात नवीन ७ पोलीस ठाणे सुरू होणार, आंबेगाव, नांदेड सिटी, बाणेर, खराडी, वाघोली, फुरसुंगीसह काळेपडळचा समावेश…

Pune : शहराचा वाढता विस्तार, गुन्हेगारी, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न विचारात घेऊन गृह विभागाने शहरात सात नवीन पोलीस ठाण्याला मंजुरी दिली आहे. त्यासाठी ६० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.
दरम्यान आता दसऱ्याच्या मुहूर्तावर सात पोलीस ठाण्यांचा श्रीगणेशा होणार आहे. नवीन पोलीस ठाण्यांच्या निर्मितीमुळे कामकाजाची विभागणी होईल, तसेच कायदा-सुव्यवस्था राखण्यास मदत होईल.
नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात येणार आहे. नवीन पोलीस ठाण्यातील कामकाजासाठी ८१६ पोलीस कर्मचारी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. आठवडाभरात या कामाची सुरुवात होईल अशी माहिती आहे.
पुणे पोलिस आयुक्तालयात आंबेगाव , नांदेड सिटी, बाणेर, खराडी, वाघोली, काळेपडळ आणि फुरसुंगी ही नवीन पोलिस ठाणे सुरू होणार आहेत. त्यास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. नव्याने पोलिस ठाणे सुरू करण्यासाठी जागाही निश्चित करण्यात आली आहे.
पोलीस ठाण्यासाठी उपलब्ध झालेला निधी…
खराडी पोलीस ठाणे : ७ कोटी ५० लाख, फुरसुंगी पोलीस ठाणे : ८ कोटी ८१ लाख, नांदेड सिटी पोलीस ठाणे : ८ कोटी ६० लाख, वाघोली ठाणे : ८ कोटी ७५ लाख, बाणेर पोलीस ठाणे : ८ कोटी ६० लाख, आंबेगाव पोलीस ठाणे: ७ कोटी ९ लाख, काळेपडळ पोलीस ठाणे : १० कोटी २४ लाख.