Maharashtra Politics : मविआचं ठरलं!! दसऱ्याला जागावाटप जाहीर करणार, ‘या’ जागांवर एकमत, कोणाला मिळणार उमेदवारी?

Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. सर्वच राजकीय पक्षांकडून विधानसभा निवडणुकीसाठी जोमाने तयारी केली जात आहे. राज्यात यंदा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्या सामना पाहायला मिळणार आहे.

तसेच आता महाविकास आघाडी आणि महायुतीत सध्या जागा वाटपावर चर्चा सुरु आहे. त्यातच आता एक मोठी बातमी समोर येत आहे. महाविकास आघाडीचे तब्बल २५० जागांवर एकमत झाले असून असून दसऱ्याला जागा वाटप जाहीर होईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
आता महाविकास आघाडी याच आठवड्यात संपूर्ण जागावाटप पूर्ण करणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यानंतर दसऱ्याच्या जवळपास तिन्ही पक्ष मिळून एकत्रित जागावाटप जाहीर करणार आहेत. Maharashtra Politics

मात्र अजूनही काही जागांवर महाविकास आघाडीमध्ये तिढा आह. साधारणपणे २५० जागांवर महाविकास आघाडीचे एकमत झाले आहे. या जागांचे जागावाटप महाविकास आघाडीकडून दसऱ्याच्या दरम्यान जाहीर केले जाईल, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.
तर काल विदर्भातील काही जागांवर पुन्हा एकदा चर्चा करण्यात आली. मुख्यत्वे करून नागपूर, वर्धा आणि बुलढाणा या जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघावर महाविकास आघाडीची चर्चा झाल्याची माहिती आहे. विदर्भातील जागा संदर्भात पहिल्या टप्प्यातील बैठकीमध्ये एकूण १२ जागांवर तिढा होता.
बारा पैकी सहा जागांचा तिढा सुटला असून आता उरलेल्या सहा जागांवर पुन्हा एकदा आज महाविकास आघाडीच्या आघाडी चर्चा होणार असल्याची माहिती आहे. शिवाय विदर्भातील उर्वरित जिल्ह्यातील जागांवर सुद्धा पुन्हा एकदा चर्चा होईल.