मुंबई ते पुणे प्रवास होणार आता सुपरफास्ट , मिसिंग लिंक प्रकल्पाचा एक महत्वाचा टप्पा पूर्ण, कधी होणार उद्घाटन? जाणून घ्या..


मुंबई : मुंबई ते पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मुंबई ते पुणे प्रवास लवकरच सुपरफास्ट होणार आहे. राज्य रस्ते विकास महामंडळाने हाती घेतलेला मिसिंग लिंक प्रकल्प लवकरच सर्वसामान्यांसाठी सुरू होणार आहे.

जेव्हा हा प्रकल्प सर्वसामान्यांसाठी सुरू होईल तेव्हा या दोन्ही मेट्रो शहरा दरम्यानचा प्रवास ३० मिनिटांनी लवकर होणार आहे. या प्रकल्पामुळे पुणे मुंबई एक्सप्रेस वे वर होणारी वाहतूक कोंडी बऱ्यापैकी कमी होणार आणि प्रवाशांचा बहुमूल्य वेळ वाचणार अशी आशा आहे.

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर तयार होत असणाऱ्या मिसिंग लिंकचे काम हे जवळपास पूर्णत्वाकडे पोहोचले आहे. या प्रकल्पातील एक महत्त्वाचा टप्पा नुकताच पूर्ण झाला आहे. हा टप्पा पूर्ण झाला असल्याने आता या प्रकल्पाचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे.

त्यामुळे आता डिसेंबर २०२४ पर्यंत हा प्रकल्प वाहतुकीसाठी सुरू होऊ शकतो असा अंदाज समोर येऊ लागला आहे. जेव्हा हा मिसिंग लिंक मार्ग वाहतुकीसाठी सुरू होईल तेव्हा मुंबई ते पुणे दरम्यान चे अंतर 6 km ने कमी होणार आहे.

दरम्यान, यामुळे मुंबई ते पुणे हा प्रवास जलद होईल अशी आशा आहे. हा प्रकल्प खंडाळा घाटातील वाहतूक कोंडी सोडवण्यास सक्षम ठरणार आहे. दरम्यान आता आपण या प्रकल्पाबाबत अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!