Raj Thackeray : जानेवारीत पगार द्यायला सरकारच्या तिजोरीत पैसे राहणार नाहीत!! लाडक्या बहिणीवरून राज ठाकरे यांनी सरकारला फटकारले….

Raj Thackeray : जुलैमध्ये महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा होतात. आत्तापर्यंत या योजनेचे दोन हप्ते महिलांच्या खात्यात जमा झालेले आहेत.

विधानसभा निवडणुका समोर ठेवून मतदारांना, प्रामुख्याने महिलांना आकर्षित करण्यासाठी सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली असा आरोप विरोधकांकाडून सातत्याने केला जात आहे.
मात्र विरोधकांच्या पोटात दुखतंय असे म्हणत सरकार या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करत लाडकी बहीण योजनेचा प्रचार करण्यात मग्न आहे. मात्र विरोधांकाची त्यावरून अद्याप टीका सुरूच असून आता त्यामध्ये एका नेत्याचे नाव जोडले गेले आहे. Raj Thackeray

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लाडकी बहीण योजनेवरून महत्वाचं वक्तव्य केलं आहे. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे कसून तयारीला लागली असून राज ठाकरे सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत.
अमरावतीमध्ये पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना राज ठाकरे यांनी लाडकी बहीण योजनेवर भाष्य केले आहे. ‘ जानेवारीत पगार द्यायला सरकारच्या तिजोरीत पैसे राहणार नाहीत’ असे राज ठाकरे म्हणाले.
‘राज्य खड्ड्यात घातलं जात असेल तर ते चुकीचं आहे. महिलांन अशा प्रकारे पैसे न देता राज्यात नवीन उद्योग आणा’ असं म्हणत राज ठाकरेंनी या योजनेवर अप्रत्यक्षरित्या टीका केली आहे.