Supriya Sule : खासदार सुप्रिया सुळे यांचे पुणे जिल्हा नियोजन समितीवर गंभीर आरोप, म्हणाल्या, आम्ही जो निधी मागतो त्यावर…


Supriya Sule : पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाविकास आघाडीकडून आंदोलन करण्यात आले आहे. पुणे जिल्हा नियोजन समितीच्या मंजूर झालेल्या कामातून महाविकास आघाडीच्या आमदारांना वगळल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात आला आहे.

याविरोधात सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात महाविकास आघाडीच्या आमदारांनी निषेध आंदोलन केले आहे.आमदार संजय जगताप, संग्राम थोपटे, आणि अशोक पवार यांना निधीतून वगळ्याचा आरोप करण्यात आला आहे. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं आहे. यावेळी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे जिल्हा नियोजन समितीवर गंभीर आरोप केले आहेत.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, आम्ही जो निधी मागतो त्यावर फुली मारली जाते. आम्हाला निधी दिला जात नाही. आम्ही जनतेची कामं करत आहोत. त्यासाठी आम्ही सरकार कडे निधी मागत आहे. हे संविधान विरोधी आहेत.

विरोधक असला तरी आमच्या काळात निधी दिला जात होता. विरोधक असला तरी ठीक पण निवडणुका पुरता विरोधक परत नाही. आमच्या काळात विरोधकांना पण निधी देत होतो, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!