Pune : पुणेकरांनो लक्ष द्या! शहरातील ‘या’ भागाचा पाणीपुरवठा राहणार गुरुवारी बंद…

Pune : पुणेकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. पाणीपुरवठ्यासंदर्भात ही अपडेट आहे. पाणीपुरवठा विभागाने जलवाहिनी देखभाल दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे गुरुवारी म्हणजेच २६ सप्टेंबर रोजी दक्षिण पुण्याचा पाणीपुरवठा बंद असणार आहे. तर शुक्रवार म्हणजेच २७ रोजी उशिरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होईल.
पुण्याच्या दक्षिण भागाला केदारेश्वर पंपिंग स्टेशन, कात्रज येथून पाणीपुरवठा होतो. दरम्यान, पाणीपुरवठा विभागातर्फे या पंपिंग स्टेशनवरील मुख्य व्हॉल्व्हचे आणि मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आहे. मात्र, या कामदरम्यान पुणेकरांची गैरसोय होणार आहे. Pune
देखभाल दुरुस्तीच्या या कामामुळे पुण्यातील दक्षिण भागाचा पाणीपुरवठा गुरुवारी म्हणजेच २६ सप्टेंबर रोजी बंद असणार आहे. तर शुक्रवार म्हणजेच २७ रोजी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन पाणीपुरवठा विभागातर्फे करण्यात आले आले.
या भागात राहणार पाणीपुरवठा बंद..
पाणीपुरवठा बंद असणारा भाग खालीलप्रमाणे – बालाजी नगर, पुण्याई नगर, काशिनाथ पाटील नगर, श्री हरी सोसायटी परिसर, कात्रज गाव, गुजरवाडी फाटा, गुजरवाडी रस्ता, वरखडेनगर, ओम्कार, भूषण सोसायटी, उत्कर्ष सोसायटी, राजस सोसायटी, कदम प्लाझा परिसर, सुखसागर नगर भाग – १ व भाग-२, आगममंदिर परिसर, संतोष नगर, अंजली नगर, दत्तनगर, जांभूळ वाडी रस्ता.
आंबेगाव रस्ता, वंडर सिटी परिसर, मोरे बाग परिसर, चंद्रभागा नगर, भारती विद्यापीठ मागील परिसर, कात्रज कोंढवा रस्ता संपूर्ण परिसर, शिवशंभो नगर, गोकुळनगर,साईनगर,गजानन नगर, काकडे वस्ती, अशरफनगर, ग्रीन पार्क, राजीव गांधीनगर व सुपर इंदिरानगरचा काही भाग, इस्कॉन मंदिर परिसर, टिळेकरनगर, कोंढवा बुद्रूक गाव, लक्ष्मीनगर, सोमजी बस स्टॉप परिसर, पुण्यधाम आश्रम रस्ता, साई सर्व्हिस, पारगे नगर,खडी मशीन परिसर, बधेनगर, येवलेवाडी, कामठे – पाटील नगर परिसर, या भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.