Ramdas Athawale : अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रामदास आठवले यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले, एकनाथ शिंदेंनी शिवसेनेचे एन्काऊंटर…

Ramdas Athawale : महिन्याभरापूर्वी बदलापूर पूर्वेतील एका नामांकित शाळेत दोन चिमुरडीवर अत्याचार करण्यात आल्याच्या घटनेने खळबळ उडाली होती. या प्रकरणातील आरोपी असलेला शाळेतील सफाई कर्मचारी अक्षय शिंदे याला पोलिसांनी अटक केली.
आरोपी अक्षय शिंदे हा सोमवारी संध्याकाळी मुंब्रा बायपासवर झालेल्या पोलीस एन्काऊंटरमध्ये ठार झाला होता. त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात अक्षय शिंदे याचा मृत्यू झाला. राज्यात सध्या या प्रकरणावर वातावरणं चांगलचं तापलं आहे. अशातच सत्ताधारी आणि विरोधकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील समोर येत आहेत.

यावर आता रामदास आठवले यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, संजय राऊत म्हणतात शिंदेंनी शिंदेच एन्काऊंटर केलं. पण एकनाथ शिंदेंनी शिवसेनेचे एन्काऊंटर केलं. उद्धव ठाकरेंच राजकीय एन्काऊंटर केलं, अशा शब्दात रामदास आठवले यांनी संजय राऊत यांच्यावर बोचरी टीका केली. Ramdas Athawale


अक्षय शिंदे याने केलेला प्रकार निंदनीय होता. माणुसकीला कलंक लावणारी ती घटना होती. मी मागणी केली होती की, त्याला फाशी व्हायला पाहिजे. त्याने पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, म्हणून त्याच्यावर गोळी झाडावी लागली. विरोधी पक्षाने यावर राजकारण करण्याची काही गरज नाही” असं रामदास आठवले म्हणाले आहे.