Ladki Bahin Yojana 2024 : अखेर ठरलं! लाडक्या बहिणींना ‘या’ दिवशी मिळणार तिसरा हप्ता, जाणून घ्या कधी येणार पैसे…

Ladki Bahin Yojana 2024 : राज्यातील महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरु केली. या योजनेचे अर्ज भरण्याची प्रक्रिया अजूनही सुरु आहे. सप्टेंबर अखेरपर्यंत महिलांना अर्ज भरता येणार आहे.
त्यानंतर पात्र महिलांना दर महिन्याला १५०० रुपये मिळत आहे. या योजनेसंदर्भात मोठी माहिती समोर आली आहे. या योजनेचा तिसऱ्या हप्त्याचे वितरणे येत्या २९ सप्टेंबर रोजी होणार आहे.
याबाबतची अधिकृत माहिती महिला व बालविकास कल्याण विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे. या निर्णयानंतर आता लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांना प्रतिमहा १५०० रुपये या हिशोबाने पैसे मिळणार आहेत.
सरकारच्या या निर्णयाबाबत मंत्री आदिती तटकरे यांनी सविस्तर माहिती दिली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा कार्यक्रम २९ सप्टेंबर रोजी रायगड येथे होणार आहे. हा तिसरा राज्यस्तरीय कार्यक्रम कार्यक्रम आहे. Ladki Bahin Yojana 2024
या कार्यक्रमात सप्टेंबरपर्यंत आलेल्या अर्जाचा लाभ वितरीत करण्यात येईल. अर्जात त्रुटी राहिल्यामुळे अनेक महिलांना अद्याप या योजनेचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे या तिसऱ्या हप्यात अशा महिलांना लाभ दिला जाणार आहे. या तिसऱ्या हप्यात एकूण २ कोटी महिलांना लाभ दिला जाईल, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे.