राज्यात काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता ! या भागात यलो अलर्ट जाहीर ..!!


 पुणे : राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार राज्यातील अनेक भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. आजही राज्याच्या विविध भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आज मराठवाड्यातील विविध जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच विदर्भातही पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मराठवाड्यातील धाराशीव, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांनाही पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर भंडारा गोंदिया वगळता संपूर्ण विदर्भात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

परभणी शहरात सलग दुसऱ्या दिवशीही जोरदार पाऊस झाला आहे. एकच तास झालेल्या पावसामुळे शहर जलमय झालं आहे.. ज्यामुळे परभणीकडून वसमतकडे जाणारी आणि वसमतकडून परभणीकडे येणारी वाहतूक मंदावली आहे. परभणी जिल्ह्यातील विविध भागात आज वादळी वारे विजासह पाऊस झाला आहे. गंगाखेड तालुक्यात तर विजांचे तांडव पाहायला मिळाले, तालुक्यात 4 ठिकाणी वीज कोसळून 8 ते 10 जनावरं मृत्युमुखी पडली आहेत.

लातूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे. औसा परिसरात मुसळधार पाऊस झाला आहे. दरम्यान, काढणीला आलेल्या सोयाबीनला मोठा फटका बसला आहे. आज सकाळपासूनच लातूर जिल्ह्यात अनेक भागात पावसाच्या मध्यम आणि हलक्या सरींनी हजेरी लावली होती. सकाळी पाच वाजल्यापासून दुपारी बारा वाजेपर्यंत अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली होती.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!