Crime News : शेजाऱ्याच्या पत्नीवर रात्री घरात घुसून बलात्कार!! ओढणीने बांधले अन्…; घटनेने राज्य हादरले

Crime News : राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

ठाणे जिल्ह्यातील भाईंदरमध्ये एकाने शेजाऱ्याच्या घरात घुसून त्याच्या पत्नीला ओढणीने बांधून बलात्कार केला. या घटनेने खळबळ उडाली असून पीडित महिलेने दुसऱ्या दिवशी सकाळी पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल केला.
सविस्तर माहिती अशी की, आरोपी रात्री ११ च्या सुमारास शेजाऱ्यांच्या घरात बळजबरीने घुसला. त्यावेळी घरात ३८ वर्षीय पीडित महिला आणि तिची तीन वर्षांची लहान मुलगी होती. आरोपीने पीडितेचे ओढणीने हात-पाय बांधले आणि तिच्यावर बलात्कार केला. पीडितेवर तिच्या लहान मुलीसमोरच आरोपीने अत्याचार केला. Crime News

आरोपीने तिच्यावर हल्लाही केल्याची माहिती भाईंदर पोलिसांनी दिली आहे. महिलेने दुसऱ्या दिवशी पोलिसात धाव घेतली आणि आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल केला गेला असून पोलिसांनी अटक केल्याची माहिती समजत आहे.