Nashik News : नाशिकच्या नामांकित इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये विद्यार्थिनीची आत्महत्या!! घटनेने शहरात एकच खळबळ…

Nashik News : नाशिकमध्ये पुन्हा एक आत्महत्येची धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील एका नामांकित इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये विद्यार्थिनीने महाविद्यालयाच्या वसतिगृहातच आत्महत्या केल्याने नाशकात एकच खळबळ उडाली आहे.

अस्मिता संजय पाटील (वय.१८) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिकमध्ये इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीने महाविद्यालयाच्या वसतिगृहात आत्महत्या केली आहे. अस्मिताने महाविद्यालयाच्या वस्तीगृहाच्या तिसऱ्या मजल्यारील रूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. Nashik News

कारण अद्याप अस्पष्ट…

दरम्यान, इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या अस्मिताने आत्महत्या का केली? याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. घटनेची माहिती मिळत पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांकडून पुढील तपास केला जात आहे. नाशिक शहरात महाविद्यालयीन तरुणीच्या आत्महत्येने खळबळ उडाली आहे.